हरविंदरला 14 दिवसांची कोठडी

November 25, 2011 5:44 PM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला करणार्‍या हरविंदर सिंगविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज नारेबाजी केली. पतियाळा कोर्टाच्या बाहेर घोषणा देत त्याचा निषेध केला. हरविंदर सिंगला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. काल गुरुवारी हरविंदर सिंगने शरद पवारांवर नवी दिल्ली येथील जंतरमंतर जवळील म.प.च्या कन्व्हेंशन सेंटरमधल्या कॉन्फरन्समध्ये हल्ला केला. कॉन्फरन्समधून बाहेर येताना पवार यांच्यावर हरविंदरने हल्ला चढवला आणि पवारांच्या श्रीमुखात भडकवली होती. वेळीच सुरक्षा रक्षकांनी झडप घालून हरविंदर रोखले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होतं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज बारामती, पुणे बंद पुकारला होता. मागील आठवड्या माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरही माथेफिरू हरविंदरने हल्ला केला होता.

close