परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ

November 25, 2011 5:53 PM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर

रिटेल क्षेत्र म्हणजेच किरकोळ बाजारात थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून आज संसदेत मोठा गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. काल कॅबिनेटच्या बैठकीत मल्टी ब्रँड रीटेलमध्ये 51 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. त्याविरोधात आज लोकसभेत तृणमूल काँग्रेस, भाजप आणि डाव्या पक्षांनी आवाज उठवला. या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची मागणी डाव्यांनी केली. संसदेच्या आत आणि बाहेरही निदर्शनं करण्याचा इशारा भाजपने दिला. पण, एफडीआयचा निर्णय मागे घेण्यात येणार नाही, अशी माहिती सरकारमधल्या सुत्रांनी दिली. सरकारने विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. एफडीआयला परवानगी दिल्याने देशात अधिक रोजगारनिर्मिती होईल तसेच शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल, असा दावा वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी केला.

close