मुंबईत सारा-सहाराची आग आटोक्यात

November 26, 2011 10:05 AM0 commentsViews: 3

26 नोव्हेंबर

दक्षिण मुंबईतल्या सारा-सहारा या शॉपिंग मॉलला मध्यरात्री 3 च्या सुमाराला भीषण आग लागली. आणि पहाटेपर्यंत ही आग पसरत जवळच्याच मनिष मार्केटपर्यंत पोचली. आज दिवसभर आग विझवण्याचे प्रयत्न झाले. संध्याकाळी ही आग आटोक्यात आली. या आगीत जवळपास पाचशे दुकानं जळून खाक झाली आहे. तर कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. सारा-सहारा शॉपिंग मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कपड्यांची छोटी छोटी दुकानं होती. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड तयार झाला… त्यामुळे फायर ब्रिगेडलाही आग विझवण्यात मोठ्या अडचणी आल्या. 26 फायर इंजिन आणि 20 वॉटर टँकर्सच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आलीय. एवढंच नाही तर नवी मुंबई महापालिकेच्या फायर ब्रिगेडचीसुद्धा मदत घेण्यात आली. आग विझवताना श्वास गुदमरल्यामुळे तीन जवानांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीसुद्धा स्वत: घटनास्थळी जाऊन पहाणी केली. दरम्यान ही आग अपघात नाही तर ती लावण्यात आल्याचा आरोप स्थानिक दुकानदार करत आहे.

close