आमदार गिरीष महाजन हॉस्पिटलमध्ये दाखल

November 25, 2011 10:58 AM0 commentsViews: 13

25 नोव्हेंबर

जळगावमध्ये भाजप आमदार गिरीष महाजन यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. आमदार गिरीष महाजन यांची प्रकृती बिघडली असून महाजन यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कापसाच्या भाववाढीसाठी महाजन यांचं उपोषण सुरू आहे. महाजनांवर उपचार सुरू आहे. पण उपोषण सोडायला मात्र त्यांनी नकार दिला आहे. दरम्यान, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी गिरीश महाजनांची हॉस्पिटलमध्ये जावून भेट घेतलीय.

close