आमदार गिरीष महाजनांचे उपोषण मागे

November 26, 2011 10:53 AM0 commentsViews: 30

26 नोव्हेंबर

कापसाला सहा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणी गेली 10 दिवस सुरु असलेलं आमदार गिरिष महाजन यांचं उपोषण अखेर मागे घेतले आहे. पक्षाचा आदेश असल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेतलं असलं तरी कापसाच्या हमीभावासाठी सुरु असलेलं आदोलन मात्र सुुरच राहणार असल्याचे महाजनांनी सांगितले. सोमवारपासून जळगाव जिल्ह्यात रास्तारोको करणार असल्याचा इशारा महाजन यांनी दिला.

close