भुजबळ आणि कपिल देव यांचेही मेणाचे पुतळे

November 25, 2011 1:03 PM0 commentsViews: 1

25 नोव्हेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचा मेणाचा पुतळा तयार करणारे प्रसिद्ध शिल्पकार सुनील कंदलूर यांनी तयार केलेल्या क्रिकेटर कपिल देव आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण आज करण्यात आलं. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कपिल देव आणि छगन भुजबळ यांच्या हस्तेच या पुतळ्यांचे अनावरण झालं. या कार्यक्रमाला अभिनेता शेखर सुमन, संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांनी उपस्थिती लावली होती. काही दिवसांपूर्वीच सुनील कंदलूर यांनी अण्णा हजारे यांचा मेणाचा पुतळा तयार केला होता. हे मेणाचे पुतळे आता लोणावळ्याच्या सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. लंडनस्थित मॅडम तुसाड वॅक्स म्युझियमच्या धर्तीवर लोणावळ्याला सेलिब्रिटी वॅट म्युझियम स्थापन करण्यात आलं आहे. लोणावळ्याच्या या म्युझियममध्ये महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, राजीव गांधी, मदर टेरेसा यांच्यासह 26 व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत.

close