पंचायत समितीतच भरवली शाळा

November 25, 2011 2:00 PM0 commentsViews: 3

24 नोव्हेंबर

भिंवडी पंचायत समितीत नागरीकांनी अनोख आंदोलन सुरु केले. गावातील शाळेला शिक्षकचं मिळत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त गावकर्‍यांनी विद्यार्थ्यांना घेवून पंचायत समितीत शाळा भरवली. करंजोटी गावात पहिली ते सातवी पर्यंत शाळा असून 129 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. या शाळेला सात शिक्षकांची गरज असून केवळ तीनच शिक्षकांची पदे भरली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होतं आहे. अनेकदा सांगुनही काहीच न झाल्यामुळे अखेर शाळा भरवण्याची पाळी गावकर्‍यांवर आली.

close