किरण बेदींच्या विरोधात एफआयआर दाखल करा : दिल्ली कोर्ट

November 26, 2011 11:59 AM0 commentsViews: 8

26 नोव्हेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या सामाजिक संस्थेला परदेशातून मिळालेल्या पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर कोर्टाने किरण बेदी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे दिल्ली कोर्टाने आदेश दिले आहे.विदेशी कंपन्या आणि अन्य काही संस्थांची फसवणूक केल्याचा किरण बेदी यांच्यावर आरोप आहे. दिल्लीतील देवेंदर सिंग चौहान या वकिलांनी बेदी यांच्यावर हा खटला दाखल केला आहे. दरम्यान, माझ्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचे मला कळवण्यात आलं आहे. याचं काही आश्चर्य वाटत नाही. यामुळे आणखी काही करण्याचा माझा निश्चय दृढ झाल्याची प्रतिक्रिया किरण बेदी यांनी दिलीय.

close