वन डेसाठी सेहवाग कॅप्टन; सचिन,धोणीला आराम

November 25, 2011 2:08 PM0 commentsViews: 7

25 नोव्हेंबर

वेस्ट इंडिजविरुध्दच्या पहिल्या दोन वन डे मॅचसाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. टेस्ट सीरिज संपल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पाच वन डे मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. यातल्या पहिल्या तीन वन डे मॅचसाठी आज मुंबईत भारतीय टीम जाहीर करण्यात आली. वन डे सीरिजसाठी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोणीला विश्रांती देण्यात आली आहे. तर कॅप्टनपदाची जबाबदारी वीरेंद्र सेहवागवर सोपवण्यात आली आहे. युवराज सिंग आणि हरभजन सिंगला पुन्हा एकदा टीमबाहेर बसावे लागले आहे. भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानची पहिली वन डे मॅच कटकमध्ये येत्या 29 तारखेला रंगणार आहे.

अशी असेल भारतीय वन डे टीम

वीरेंद्र सेहवाग – कॅप्टन, गौतम गंभीर,अजिंक्य रहाणे, पार्थिव पटेल, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, मनोज तिवारी, आर अश्विन, राहुल शर्मा, रवींद्र जडेजा, विनय कुमार, प्रवीण कुमार, उमेश यादव आणि वरुण ऍरॉन.

close