राहुल गांधींच्या रॅलीत पुन्हा हाणामारी

November 26, 2011 12:03 PM0 commentsViews: 7

26 नोव्हेंबर

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या उत्तर प्रदेशातल्या रॅलीमध्ये पुन्हा एकदा हाणामारी झाली आहे. राहुलच्या सभेत गोंधळ घालू पाहणार्‍या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. राहुल गांधींची सभा सुरु असताना समाजवादी पार्टीचे दहा-बारा कार्यकर्ते घुसले. आम्ही भिकारी नाही, राहुल गांधी शर्म करो, अशा घोषणा लिहलेल्या टी-शर्ट्स घालून हे कार्यकर्ते राहुलविरोधी घोषणा देत होते. या घोषणा ऐकताच काँग्रेस कार्यकर्तेही संतापले आणि त्यांनी घोषणाबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप द्यायला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं.

close