26 /11 मधील पीडितांना अटक

November 26, 2011 1:17 PM0 commentsViews: 2

26 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. पण अजूनही या हल्यात जखमी झालेल्यांना न्याय मिळालेल्या नाही. 26/ 11 च्या हल्ल्यातील अशाच काही पीडित नागरिकांनी आज आपलं गार्‍हाणं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांकडे जाण्याआधीच पोलिसांनी या पीडितांना अटक केली. मुंबई हल्ल्यात जखमी झालेल्या अपंग झालेल्या या पिडितांना पोलिसांनी व्हॅनमध्ये कोंबलं आणि तुरुंगात टाकलं आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली हे सर्व पीडित मुख्ममंत्र्यांना भेटायला निघाले होते. पण पोलिसांनी यावेळी किरीट सोमय्या यांनाही अटक केली. 26/11 च्या दिवशीच या पीडितांना सरकारने दिलेली वागणून अत्यंत चीड आणणारी असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

close