सचिन पाटील यांच्यावर मुलगा लपवण्याचा आरोप

November 26, 2011 1:33 PM0 commentsViews: 7

26 नोव्हेंबर

राज्यपालांचे एडीसी (ADC) आणि आयपीएस (IPS) आधिकारी सचिन पाटील अडचणीत आले आहेत. आपल्या चार वर्षाच्या मुलाला लपवल्याचा आरोप सचिन पाटील यांच्या पत्नी डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी केला. मुलाचा ताबा घेण्यासाठी तेजस्वीनी यांनी कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने मुलाची कस्टडी घेण्याची परवानगीसुद्धा दिली. आदेशानुसार तेजस्वीनी पाटील या तीनबत्ती पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षकांनी सचिन पाटील यांच्या राजभवनातल्या घरी गेल्या. पण घराची संपूर्ण झडती घेतल्यानंतरही त्यांना मुलगा सापडला नाही. एवढंच नाही तर एडीसी सचिन पाटील तासाभरात येतो म्हणून गेले ते संध्याकाळपर्यंत आलेच नाही. या झडतीचा अहवाल कोर्टाला सादर करावा, अशी तक्रार डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली.

close