औरंगाबादमधील वाळूंज रस्त्याची दुर्दशा

November 19, 2008 11:28 AM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर, औरंगाबाद सिटीझन जर्नलिस्ट सुमीत खांबेकर गेल्या काही वर्षांपासून वाळूंज महानगर परिसरात इंडस्ट्री वाढली आहे. त्यामुळे औरंगाबाद ते वाळूंज दरम्यान वाहतुकही वाढली. पण इथे अपघातांचं प्रमाणही वाढलंय. रस्त्यावरील पूल अरूंद असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतूक धीम्या गतीनं होती. या रस्त्याची दुरू स्ती कोण करणार, हे रहिवाशांना माहीतच नाही. या रस्त्यावर ये-जा करणारे शिवाजी म्हापुड यांनी सांगितलं की रस्त्याची बिकट अवस्था आहे. रोज अपघात घडत असतात. आंदोलन करून हा प्रश्न सोडवला पाहिजे.

close