कोल्हापुरात गुळ सौदे बंद

November 26, 2011 8:16 AM0 commentsViews: 6

26 नोव्हेंबर

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्‍यांनी आडमुठं धोरणं स्वीकारत गुळ सौदे बंद केलेत. त्यामुळे बाजार समितीत शेतकर्‍यांचे 65 हजार गुळ रवे पडून आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांच्या या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी आणि गुर्‍हाळघर मालक आक्रमक झाले आहेत. व्यापार्‍यांची मगरुरी मोडीत काढण्यासाठी शेतकर्‍यांनी गुर्‍हाळघरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे व्यापारी आणि गुळ उत्पादक शेतकर्‍यामधील वाद चांगलाच पेटला. 400 कोटीची उलाढाल असलेली गुळाची बाजारपेठ व्यापार्‍यांच्या मनमानीमुळे गेले दोन दिवस ठप्प आहे.यामध्ये शेतकर्‍याचे नुकसान होतंय. त्यामुळे राज्यसरकारने गुळाला हमी भाव देवून त्यांना दिलासा द्यावा तसेच मनमानी करणार्‍या व्यापार्‍यंाचे परवाने रद्द करावेत अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होती.

close