शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याचे अनावरण

November 26, 2011 4:21 PM0 commentsViews: 17

26 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी असिस्टंट सब-इन्स्पेक्टर तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याचं आज गिरगाव चौपाटी इथं अनावरण करण्यात आलं. आपल्या प्राणांची आहुती देत तुकाराम ओंबळे यांनी अतिरेकी अजमल आमीर कसाब याला जिवंत पकडून दिलं. ओंबळेंच्या पुतळ्याचे आज मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर अनावरण करण्यात आलं. याला प्रेरणास्थळ असं नाव देण्यात आलंय. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं. मुंबई महापालिकेनं हा पुतळा बसवला आहे.

close