राळेगणमध्ये कडक सुरक्षा

November 26, 2011 9:09 AM0 commentsViews: 2

26 नोव्हेंबर

राळेगणमध्ये काल झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर राळेगणमधली सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यात आली. राळेगणमधे येणार्‍या सर्व रस्त्यांची नाकेबंदी करण्यात आली असून गाड्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. काल आंदोलन करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राळेगणवासियांनी पिटाळून लावले होते. त्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली. दरम्यान अण्णा हजारे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहनं केलं आहे.

close