ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर झहीर आत, भज्जी बाहेर

November 26, 2011 4:16 PM0 commentsViews: 4

26 नोव्हेंबर

वेस्ट इंडीज विरुद्धच्या सीरिजनंतर भारतीय टीम डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार आहे. आणि या दौर्‍यासाठी भारतीय टीम जाहीर करण्यात आली आहे. सतरा जणांच्या या टीममध्ये हरभजन सिंगला स्थान मिळालेले नाही. त्याच्या ऐवजी टीममध्ये दोन स्पिनर्स असतील ते प्रग्यान ओझा आणि आर अश्विन. झहीर खानने टीममध्ये कमबॅक केलं आहे. पण तो जेव्हा पूर्णपणे मॅचफिट होईल तेव्हाच तो ऑस्ट्रेलियात दाखल होईल. मिडल ऑर्डरमध्ये रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांनाही संधी मिळालीय. तर टीमचा दुसरा विकेटकीपर असेल वृद्धीमान साहा आणि वीरेंद्र सेहवाग टीमचा व्हाईस कॅप्टन असणार आहे.अशी असेल टीम

महेंद्रसिंग धोणी (कॅप्टन), विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे,वृद्धीमान साहा, ईशांत शर्मा, झहीर खान, उमेश यादव, वरुण एरॉन, प्रवीण कुमार,प्रग्यान ओझा, आर अश्विन

close