आर.अश्विनला दिलीप सरदेसाई पुरस्कार जाहीर

November 28, 2011 12:33 PM0 commentsViews: 1

28 नोव्हेंबर

यावर्षीचा दिलीप सरदेसाई पुरस्कार युवा स्पिनर आर.अश्विनला जाहीर झाला आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या टेस्ट सीरिजमध्ये त्याने अठरा विकेट घेण्याबरोबरच एक सेंच्युरीही ठोकली. या कामगिरीमुळेच त्याची या पुरस्कारासाठी निवड झालीय. येत्या दहा डिसेंबरला बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. आणि तिथेच आर. आश्‍विनला हा पुरस्कार देण्यात येईल. पाच लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

close