..तर ओबीसी उमेदवाराला मत देऊ नका – भुजबळ

November 28, 2011 3:27 PM0 commentsViews: 2

28 नोव्हेंबर

ओबीसी असल्याचं खोटं जातप्रमाण पत्र दाखवून निवडणुकीचं तिकीट मिळवणार्‍या उमेदवारांना ओबीसी मतदारांनी मतदान करु नये असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी पक्षादेश बाजूला ठेवून ओबीसी मतदारांनी त्याला धडा शिकवला पाहिजे असं परखड मतही त्यांनी व्यक्त केलं. पुण्यात आज महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांना सामाजिक समता पुरस्कार देण्यात आला. त्या कार्यक्रमानंतर भुजबळ यांनी हे मत व्यक्त केलं.

close