कापूस प्रश्नी भाजपचे चक्काजाम आंदोलन ; 60 कार्यकर्त्यांना अटक

November 28, 2011 9:36 AM0 commentsViews: 1

28 नोव्हेंबर

कापसाच्या वाढीव हमीभावासाठी भाजपचे आंदोलन सुरूच आहे. नागपूर- मुंबई महामार्गावर आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आमदार महाजनांसह 60 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येतं आहे. औरंगाबाद-पुण्याकडे जाणार्‍या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहे. तर शेंदुर्णीपाचोरा इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखून धरली.

close