परकीय गुंतवणुकीच्याविरोधात 1 डिसेंबरला भारत बंदची हाक

November 28, 2011 3:35 PM0 commentsViews: 3

28 नोव्हेंबर

रिटेल क्षेत्रात 51 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिल्याच्या विरोधात 1 डिसेंबरला व्यापार्‍यांनी भारत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये महाराष्ट्रातल्या होलसेल आणि किरकोळ व्यापार्‍यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्वत शहरांमध्ये बंद यशस्वी करण्याचा निर्धार विविध व्यापारी संघटनांनी केला. एकट्या मुंबईत 1 डिसेंबरला सुमारे दीड लाख होलसेल आणि किरकोळ दुकानं बंद राहणार असल्याची माहिती रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी दिली आहे. थेट परकीय गुंतवणुकीला आता विरोध वाढू लागला आहे. नवी मुंबईतल्या व्यापारी आणि माथाडी कामगारांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात आज व्यापारी आणि माथाड्यांनी परदेशी गुंतवणुकीविरोधात मोर्चा काढला आहे.

close