सरकारलाच थप्पड मारायला हवी – उद्धव ठाकरे

November 28, 2011 5:32 PM0 commentsViews: 1

28 नोव्हेंबर

सर्व सामान्य माणूस का पेटतो, पेट्रोलचे दर, रॉकेल, सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य नागरीक महागाईच्या आगीत होरपाळत आहे आणि सत्ताधारी जर महागाईचे समर्थन करत असेल तर त्याने थप्पड सरकारला मारली पाहिजे अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केली. पुण्यात पश्चिम महाराष्ट्र शिवसेना शिबिरात उद्धव ठाकरे बोलत होते.

निवडणुकांच्या तोंडावर आता राजकीय वातावरण गरम होतं चाललं आहे. आज पुण्यात शिवसेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र शिवसेना शिबिर भरवण्यात आलं आहे. या शिबिरात कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी सरकारवर हल्ला बोल केला. ऐन निवडणुका आल्यावरच दलित आणि शोषित समाजाची काँग्रेसला आठवण येते तसेच शोषितांची आठवण फक्त महात्मा फुलेंची जयंती आल्यावरच येते का, असा सवाल करत उध्दव ठाकरे यांचा महापालिकांच्या निवडणूक प्रचाराचेच संकेत दिले. त्याचबरोबर त्यांनी रिटेलमध्ये विदेशी गुंतवणुकीलाही विरोध केला.

परदेशी लोकांच्या तालावर हा देश नाचतोय असं उध्दव म्हणाले. शरद पवारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध यावेळे उध्दव यांनी केला. शरद पवारांवर हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सपूर्ण महाराष्ट्र एकवटला. कारण एका मराठी माणसावर झालेला हल्ला हा सहन करण्याच्या पलीकडे आहे. बाळासाहेबांनी पण पवारांच्या हल्ल्याचा निषेध केला पण देशात अराजक माजेल याची आठवण पवारांना आताच का झाली, असा सवालही विचारला. महागाईच्या आगीत होरपाळणार्‍या सर्वसामान्य जनतेकडे सत्ताधार्‍यांनी त्यांच्यात उतरुन दिलासा दिला पाहिजे पण हे होतचं नाही सत्ताधारी जर महागाईचे समर्थन करत असतील तर सरकारला थप्पड मारली पाहिजे अशी टीका उध्दव यांनी केली.

close