एसआयईएस कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस

November 28, 2011 5:02 PM0 commentsViews: 1

28 नोव्हेंबर

नवी मुंबईत नेरुळच्या एसआयईएस (SIES) कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्याचा आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे. आयटीच्या पहिल्या वर्षात ही मुलगी शिकते. या विद्यार्थिनीने आपल्या पालकांबरोबर आज कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे याबाबत तक्रार दाखल केली. गुरूवारी दुपारी कॉलेजच्या परिसरात काही मुलं आणि मुलींनी आपल्याला मिरची खायला लावून उठबशा काढायला लावल्याचा आरोप या मुलीने केला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दोषी विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणी करत प्रिन्सिपलकडून तसं लेखी आश्वासनही घेतल्याचा दावा केला. कॉलेज प्रशासनाने जर दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई केली नाही तर पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा या मुलीच्या पालकांनी केला.

close