टीम अण्णांनी घेतला न्यायाधीशांच्या भूमिकेवरच आक्षेप

November 28, 2011 11:48 AM0 commentsViews: 1

28 नोव्हेंबर

आथिर्क गैरव्यवहारांच्या आरोप-प्रकरणात किरण बेदींची टीम अण्णांनी पाठराखण केली. अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी किरण बेदींवरचे आरोप निराधार असल्याचे आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले. एवढंच नाही तर त्यांनी कोर्टाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. किरण बेदी यांच्याविरोधात देविंदर सिंग या वकिलानी दिल्लीतल्या कोर्टात याचिका दाखल केली होती. पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत कॉम्प्युटर ट्रेनिंग देण्याच्या नावाखाली बेदींनी मायक्रोसॉफ्टसारख्या परदेशी कंपन्यांकडून पैसे घेतले. पण प्रत्यक्षात महिन्याला 20 हजार रुपयांची फी घेतली. असा आरोप याचिकेत करण्यात आलाय. या याचिकेनंतर बेदींविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. हे आदेशच चुकीचे असल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर हा आदेश देताना, न्यायाधीशांवर दबाव होता का याचं उत्तर मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. या आमच्या आरोपांबाबत न्यायालयाचा अवमान झाला असं वाटत असेल तर त्यालाही आम्ही सामोरे जावू, अस आव्हानही केजरीवाल यांनी दिलं.

close