महेश भट्ट करणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री

November 28, 2011 5:48 PM0 commentsViews: 1

28 नोव्हेंबर

सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनेक सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात हजेरी लावतात. स्वामी अग्निवेश यांच्यानंतर दिग्दर्शक महेश भट्टसुद्धा बुधवारी बिग बॉसच्या घरात जाणार आहेत. या आधी काही कलाकारांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली होती. पण दिग्दर्शक महेश भट्ट मात्र अमेरिकन अभिनेत्री सन्नी लिऑनला आपल्या सिनेमातल्या लिड रोलसाठी ऑफर करण्यासाठी बिग बॉसमध्ये जाणार आहेत. पूजा भट्टच्या जिस्म या सिनेमाच्या सिक्वलमध्ये सन्नीला लिड रोल देण्याचा महेश भट्ट यांचा विचार आहे.

close