डोंबिवलीत दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरुच ; साडेचार लाखांचे दागिने लंपास

November 29, 2011 9:37 AM0 commentsViews: 3

29 नोव्हेंबर

मुंबईतील डोंबिवली शहरात दरोड्याचं सत्र ताजं असतानाच डोंबिवलीजवळ असलेल्या खोणी गावात सोमवारी पहाटे दरोडा पडला आहे. एका हाताने अपंग असलेल्या किशोर पाटील यांच्या घरात घुसून दरोडेखोरांनी किशोर पाटील आणि त्यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांना अमानुष मारहाण केली. तसेच घरातील तिजोरी फोडून लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले. किशोर पाटील यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजार्‍यांनी पाटील आणि त्यांच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. दरोडेखोर अजून फरार आहेत.

close