शिवसेनेची कापूस दिंडी बुलडाण्यात दाखल

November 29, 2011 9:43 AM0 commentsViews: 2

29 नोव्हेंबर

कापसाला सहा हजार रुपये हमीभाव देण्यात यावे यामागणीसाठी शिवसेनेची कापूस दिंडी आज बुलडाण्यात पोहोचली. सिंदखेडराजा इथं जिजाई यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन ही दिंडी पुढे निघाली आहे. कापूस आणि सोयाबीनला वाढीव हमीभाव मिळावा यासाठी सेना आग्रही आहे. 21 नोव्हेंबरपासून गुरुकुंज मोझरी इथून या दिंडीची सुरुवात झाली होती. उद्या या दिंडीचा समारोप उद्या वर्ध्यात होणार आहे. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पवनार इथ या दिंडीचा समारोप होणार आहे.

close