मुंबईत 1995 नंतरच्या झोपडीधारकांना मिळणार पक्की घरं

November 29, 2011 10:41 AM0 commentsViews: 7

29 नोव्हेंबर

मुंबईतल्या 1 जानेवारी 1995 नंतरच्या झोपडीधारकांना पक्की घरं देण्याचा सरकारचा विचार आहे. 1995 नंतरच्या झोपड्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या राजीव गांधी आवास योजनेमध्ये सामावून घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी या झोपडी धारकांकडून 50 टक्के बांधकाम खर्च वसूल करुन त्यांना पक्की घरं देण्याचा प्रस्ताव गृहनिर्माण खात्याने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडणार, 2000 पर्यंतच्या झोपड्या नियमीत करण्याचा निर्णय, या आधीच राज्य सरकारने घेतला. पण सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीमुळे या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारला करतायेत नाही.

close