परकीय गुंतवणुकीमुळे शेतकर्‍यांना फायदा – पंतप्रधान

November 29, 2011 11:44 AM0 commentsViews: 1

29 नोव्हेंबर

लोकपाल विधेयक आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या युवक काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. अमेरिकेत शस्त्रक्रिया झाल्यानंतर सोनिया गांधींचं हे पहिलंच भाषण होतं. लोकपाल कायदा मंजूर करण्यासाठी विरोधक सहकार्य करतील, अशी आशा सोनियांनी व्यक्त केली. आरटीआय (RTI) कायदा, रोजगार हमी योजना काँग्रेसनंच आणल्या याची आठवण त्यांनी करून दिली. तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर हल्लाबोल केला.विरोधकांच्या विरोधामुळे जनतेचा विश्वासघात होतोय असा टोला पंतप्रधानांनी लगावला. रिटेलमध्ये एफडीआय (FDI)चं समर्थन त्यांनी केलं. परदेशी गुंतवणुकीमुळे शेतकर्‍यांचा फायदा होईल असा दावा ही पंतप्रधानांनी केला. तसेच देशभरातल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची भेट यावेळी दोन्ही नेत्यांनी घेतली.

close