स्पेक्ट्रम प्रकरणी शाहीद बलवालाही जामीन

November 29, 2011 12:08 PM0 commentsViews:

29 नोव्हेंबर

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी काल कनिमोळींसह पाच जणांना जामीन मिळाल्यानंतर आज स्वान टेलिकॉमचा प्रमोटर्स शाहीद बलवालाही जामीन देण्यात आला आहे. पतियाळा कोर्टाने हा निर्णय दिला आहे.5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. बलवाच्या जामीनाला सीबीआयने विरोध केला नाही. तसेच बलवांना जामीन देत कोर्टाने देश सोडून जाण्यास मनाई केली आहे. दरम्यान बलवांची आज संध्याकाळपर्यंत तिहारमधून सुटका होण्याची शक्यता आहे.

close