बाहेरच्या पक्षातून येणार्‍यांना उमेदवारी नाही – राज ठाकरे

November 29, 2011 6:10 PM0 commentsViews: 3

29 नोव्हेंबर

निवडणुकीच्या तोंडावर बाहेरच्या पक्षातून आलेल्या कोणालाही तिकीट मिळणार नाही. जो काय मुंबईचा विकास करायचा आहे तो तुम्ही आणि मीच करूया अशी हमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली. मुंबईतल्या षन्मुखानंद सभागृहात मनसेच्या नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कोणताही ताण न घेता परीक्षेला सामोरे जा आणि चांगले उमेदवार म्हणून महापालिकेत काम करा, असा सल्ला राज यांनी इच्छुकांना दिला. इच्छुक उमेदवारांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी या मेळाव्यात राज ठाकरेंनी मार्गदर्शन केल्याचं बोललं जातं आहे.

close