भारताचा रोमहर्षक विजय

November 29, 2011 5:46 PM0 commentsViews: 2

29 नोव्हेंबर

भारतीय टीमने कटक वन डे एका विकेटने जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीय. मुंबई टेस्टप्रमाणेच ही वन डेही शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगली. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये भारतीय टीमला जिंकायला नऊ रन हवे होते. पण वरुण एरॉन आणि उमेश यादव ही शेवटची जोडी मैदानात होती. पण या ओव्हरमध्ये दोघांनी एक – एक फोर मारला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. त्यापूर्वी भारतीय टीमला विजयासाठी 212 रनची गरज असताना टीमची सुरुवात मात्र खराब झाली होती. पहिल्या पाच विकेट 59 रनमध्येच गेल्या. पण रोहीत शर्मा आणि रवी जाडेजाने इनिंग सावरली. रोहीत शर्माने 73 रन करत विजयात मोठी भूमिका बजावली. आता दुसरी वन डे शुक्रवारी विशाखापट्टणमला होणार आहे.

close