आसामी लेखिका इंदीरा गोस्वामी यांचे निधन

November 29, 2011 6:03 PM0 commentsViews: 6

29 नोव्हेंबर

प्रसिद्ध आसामी लेखिका इंदीरा गोस्वामी यांचं निधन झालं. त्या 69 वर्षांच्या होत्या. 'मामुनी रायसोम गोस्वामी' या टोपणनावानं त्यांनी अनेक कादंबर्‍या, लघु कथा लिहिल्या आहेत. काल रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. गुवाहाटी इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या आठ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या सन्मान करण्यात आला होता. उल्फा अतिरेकी आणि सरकार यांच्यादरम्यानच्या शांतता चर्चांमध्ये त्यांनी मध्यस्थ म्हणूनही काम केलं होतं.

close