झिपरुच्या मृत्यूप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

December 1, 2011 10:05 AM0 commentsViews: 1

1 डिसेंबर, मुंबई

झिपरु मुकणे या मजुराच्या मृत्यूप्रकरणी वीटभट्टीमालक बाळू चौधरी याच्यासह त्याची दोन मुलं गणेश आणि बंटी तसंच पत्नी नागिण चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. शहापूर कोर्टानं याप्रकरणी या चारही आरोपींना 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पुरागोमी राज्याचं बिरुद मिरवणार्‍या महाराष्ट्राच्या नावाला काळं फासणारी एक घटना शहापूरजवळच्या वाशिंदमध्ये घडली होती. झिपरु मुकणे या वीटभट्टीवर काम करणार्‍या मजुराला त्याच्या मालकानं केलेल्या अनामुष छळामुळे जीव गमवावा लागला. याप्रकरणी हायकोर्टानं स्वत:हून दखल घेत कारवाईचे आदेश दिले. तसंचयाप्रकरणी सीआयडी चौकशीही सुरु झाली.

close