निमशासकीय नर्सेसचं कामबंद आंदोलन

November 29, 2011 7:32 AM0 commentsViews: 6

29 नोव्हेंबर

आज राज्यात शासकीय आणि निमशासकीय नर्सेसनी एक दिवसाचं कामबंद आंदोलन केलं. ट्रेंड नर्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही नर्सेसची संघटना या आंदोलनात सहभागी झाली होती. त्याचबरोबर नर्सिंग कॉलेज संघटनेनंही या आंदोलनाला पाठिंबा दिला. आज राज्यभर ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून सरकारच्या प्रस्तावित विधेयकाला विरोध केला गेला. राज्य सरकारने नर्सिंग काऊंसील बरखास्त करण्याचा प्रयत्न दोन वेळा केला होता. पण हायकोर्टाने सरकारच्या निर्णयला स्थगिती दिली होती. अखेर राज्य सरकारने नर्सेस आणि पॅरामेडिकल यांना विलिन करणारे एक विधेयक तयार केलंय. येत्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर केलं जाणार आहे. पॅरामेडिकल हे तंत्रज्ञ शाखेअंतर्गत येतात तर नर्सिंग ही सेवा आहे. त्यामुळे नर्सेसचा सरकारच्या प्रस्तावित कायद्याला विरोध आहे.

close