जिग्नाची नार्को टेस्ट करण्याची पोलिसांची मागणी

December 1, 2011 12:24 PM0 commentsViews: 1

1 डिसेंबर, मुंबई

ज्येष्ठ पत्रकार जे. डे. यांच्या हत्येप्रकरणी एशियन एजची पत्रकार जिग्ना व्होरा हिच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. जिग्नाची पोलीस कोठडी 5 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. जिग्नाची नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांच्या वकिलांनी कोर्टात केली. पण बचाव पक्षानं त्याला विरोध केला. शुक्रवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. मिड डे चे वरिष्ठ पत्रकार जे.डे. यांची 11 जुनला हत्या झाली होती. जे.डें.ची हत्या छोटा राजन गँगने केली होती..जिग्ना व्होरा हिला शुक्रवारी अटक अटक करण्यात आली होती.

close