नक्षलवाद्यांनी केली ग्रामपंचायत कार्यालयाची जाळपोळ

November 29, 2011 4:34 PM0 commentsViews: 3

29 नोव्हेंबर

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आरमोरी तालुक्यातील वैरागड ग्रामपंचायत कार्यालयाची जाळपोळ केली. गेल्या तीन दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी रविवारी मालेवाडा ग्रामपंचायत कार्यालय नक्षलवाद्यांनी पेटवून दिलं होतं. माओवादी नेता किशनजी याच्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी काळा सप्ताह पाळण्याचे आवाहन केलं आहे. या अंतर्गत ही जाळपोळ करण्यात आली. पहाटे 3 वाजता 30 ते 40 शस्त्रत नक्षलवाद्यांनी ही जाळपोळ केली. किशनजी याच्या मृत्युचा निषेध करणारी पत्रकही नक्षलवाद्यांनी घटनास्थळावर सोडली. मावोवादी नेता किशनजीच्या मृत्युनंतर सध्या जिल्हात रेड अलर्ट घोषीत करण्यात आलं आहे.

close