ओबीसी कोट्यात मागासवर्गीय मुस्लिमांचा समावेश; केंद्र सरकार घेणार निर्णय

December 1, 2011 1:31 PM0 commentsViews: 1

1 डिसेंबर

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मुस्लीम कार्ड वापरलंय. मागासवर्गीय मुस्लिमांना ओबीसी मध्येच कोट्यांतर्गत कोटा देण्याचा सरकारचा विचार आहे. कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी ही माहिती दिलीय. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलंय. मुस्लिमांसाठी स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी केंद्राला पत्र लिहून केली होती. त्यानंतर केंद्रानं मुस्लिमांना ओबीसी कोट्याअंतर्गतच कोटा देण्यासाठी सरकारनं पाऊल उचललंय.

close