ऑन ड्युटी झोपणार्‍या पोलिसांवर होणार कारवाई

November 29, 2011 5:18 PM0 commentsViews: 3

29 नोव्हेंबर

डोंबिवलीत रविवारी पहाटे दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे तीन दरोडेखोरांना पकडण्यात आलं आहे. यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत पाच जण जखमीही झाले. प्रत्यक्षात दरोडा पडला त्यावेळी नागरिकांनी पोलिस स्टेशन गाठलं तेव्हा इथं पोलीस झोपलेले असल्याचं दिसलं होतं. आयबीएन लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर आता पोलीस प्रशासनाला जाग आली आहे. ठाण्याचे पोलीस कमिश्नर के.पी.रघुवंशी यांनी डोंबिवली आणि खोणीगाव या दोन्ही ठिकाणी भेट दिली. त्याच बरोबर या पोलिसांची चौकशी करुन दोषींवर कारवाईचे आश्वासन आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहे.

close