मंदीमुळे पेप्सीचं कॉस्ट कटिंग

November 19, 2008 12:30 PM0 commentsViews: 2

19 नोव्हेंबरसिटी बँकेपाठोपाठ पेप्सी बॉटलिंग कंपनीनंही तीन हजार एकशे पन्नास कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत कंपनीची विस्तारीकरणाची योजना आहे. कंपनी कॅनडा आणि अमेरिकेत ,विक्री आणि सेवा तसंच लॉजिस्टीक्स विभागातूनही सुमारे साडेसातशे कर्मचारी कमी करणार आहे . मेक्सिकोमधला प्लान्ट आणि वितरण केंद्रही कंपनी बंद करणार आहे. यामुळे सुमारे दोन हजार दोनशे जणांच्या नोकरीवर गदा येईल. पेप्सीप्रमाणेच हाँगकाँगस्थित एचएसबीसी बँकदेखील त्यांच्या हाँगकाँगमधल्या शाखांमधून पाचशेजणांची घट करणार आहे. डिएलएफ मेरिल लिंच याची म्युच्युअल फंड कंपनी ब्लॅकरॉक देखील आता अमेरिकेत कर्मचारी कपात करणार आहे.

close