दिल्लीत इमारत कोसळून 3 ठार

December 3, 2011 9:45 AM0 commentsViews: 1

03 डिसेंबर

नवी दिल्ली येथील उत्तमनगर येथे दुपारी 12 च्या सुमाराला चार मजली बिल्डिंग कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी 3 जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती आहे. उत्तम नगर भागात मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना बचावकार्याला सुरुवात केली आहे.

या इमारतीमध्ये 4 ते 5 परिवार राहत होते.तसेच याच इमारती मजूर राहत असल्याचे पुढे आले आहे. आणि ही इमारत जुणी असल्याने यामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीच्या बाजूला बेसमेंटचे खोदकाम सुरु होते. यामुळे इमारतीला तडे गेले आणि हा अपघात झाला. सध्या अपघात स्थळी लोकांनी मोठी गर्दी केल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे.

close