नारायण राणे राज्याचे ‘दिग्विजय सिंग’ – मुनगंटीवार

December 3, 2011 9:57 AM0 commentsViews: 1

03 डिसेंबर

नारायण राणेंच्या रुपाने महाराष्ट्रात दिग्विजय सिंगांनी जन्म घेतलाय, असा शाब्दिक हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत केला. आयुष्यभर सुपारीच्या चक्रात अडकलेल्या नेत्यांनी अशी वक्तव्य करु नये असंही ते म्हणाले. काल उद्योगमंत्री नारायण राणेंनी, अण्णा हजारेंवर घणाघाती टीका केली होती. अण्णा कुणाच्यातरी सांगण्यावरुन काँग्रेसविरुद्ध आंदोलन करत असल्याचा आरोप राणेंनी केला. राणे एवढे बोलून थांबले नाहीत, अण्णा कुणाची सुपारी घेवून काँग्रेस विरुध्द प्रचार करत आहे, भाजपची की परदेशी एनजीओची असा जळजळीत प्रश्नही राणेंनी अण्णांना विचारला.

close