पुण्यात 30 झोपड्या जळून खाक

December 3, 2011 11:15 AM0 commentsViews: 1

03 डिसेंबर

पुण्यात पाटील इस्टेट झोपडपट्टीला आग लागली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचं फायर ब्रिगेडच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. साधरण 25 ते 30 झोपड्या या आगीत जळून खाक झाल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेचे 17 फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी आग विझवत होती. दीड तासानंतर ही आग विझवण्यात यश आलं. पण या आगीत कोणतीही सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

close