पुण्यात अग्निशमन दलाचे वाजले बारा !

December 3, 2011 11:52 AM0 commentsViews: 20

अद्वैत मेहता, पुणे

03 डिसेंबर

एकीकडे पुणे शहरातल्या उंच इमारतींचं प्रमाण वाढतंय. पण अशा उंच इमारतींना आग लागली तर ती विझवण्यासाठी पुण्याच्या अग्निशमन दलाकडे यंत्रणाच नाही. 32 मीटर आणि 42 मीटर उंचीवर जाऊन आग विझवणार्‍या अग्निशामन विभागाकडे असलेल्या दोन्ही गाड्या गेले 6 महीने नादुरूस्त असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आणि कहर म्हणजे यातली एक गाडी आता दुरूस्तच होणार नाही तर दुसरी गाडी दुरूस्त व्हायला आणखी 3 महिने लागणार आहेत. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेचा गलथानपणा पुढं आणला.

पुण्यातील भवानी पेठेत असणार्‍या अग्नीशामक विभागाच्या मुख्यालयाच्या आवारात असणार्‍या 2 फायर फायटर्स. एक आहे भारतीय बनावटीची हिप्पो जी 30 वर्ष जुनी 32 मीटर उंचीपर्यंतची आग विझवू शकणारी गाडी तर दुसरी आहे मर्सीडिज कंपनीची 42 मीटर पर्यंतची आग विझवू शकणारी गाडी पण या दोन्ही गाड्या तब्बल 6 महिने नादुरूस्त आहेत आणि कारण काय तर रिपेअर टेंडरंच आलं नाही. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी मिळवलेल्या माहितीमधून हे उघड झालं आहे.

एकुणच पुणे शहराच्या लोकसंख्येचा आणि क्षेत्रफलाचा विचार करता केंद्र सरकारच्या फायर ब्रिगेडच्या नियमावलीनुसार शहरात एकुण 35 फायर स्टेशन्स आणि 35 अग्निशमन बंबांची गरज आहे पण शहरात आहेत फक्त 10 फायर स्टेशन्स आमि त्यात आहेत 23 आगीचे बंब. अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनाही या वस्तुस्थितीची कल्पना आहे.

सामान्य पुणेकरांच्या जिविताशी संबंधीत असलेल्या विषयावरचं टेंडर इतके दिवस निघू नये यावरून महापालिका प्रशासनाचा निगरगट्टपणा पुढे आला. अशातच असलेल्या गाड्या दुरूस्त करायचं सोडून नवीन गाडी खरेदी करण्याकरता परदेशी वारी करणं म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागं लागण्याचा प्रकारच म्हणायला हवा.

close