टॉम क्रुझ मिशन प्रमोशनसाठी भारतात दाखल

December 3, 2011 11:59 AM0 commentsViews: 2

03 नोव्हेंबर

हॉलिवूडमधला सगळ्यांचा लाडका अभिनेता टॉम क्रुझ 'मिशन इमपॉसिबल 4-घोस्ट प्रोटोकॉल' या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो दिल्लीत आला आहे. रविवारी त्याच्या काही फॅन्ससाठी मुंबईत या सिनेमाचे स्क्रिनिंगही ठेवण्यात आलं आहे. पण त्याआधी तो अभिनेता अनिल कपूर आणि पॉला पॅटॉनसह आगर्‍यातल्या ताजमहालला भेट देणार आहे आणि मुंबई भेटीनंतर तो गाठणार आहे थेट दुबई. टॉम क्रुझच्या या अगोदरच्या मिशन इमपॉसिबल 1,2 आणि 3 भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या सिनेमाने प्रदिर्घ यशानंतर आता चौथा भाग येत आहे.

close