राहुल गांधींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता – अण्णा हजारे

December 3, 2011 5:31 PM0 commentsViews: 2

03 नोव्हेंबर

राहुल गांधी यांचा अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता. मात्र पंतप्रधानांनी लेखी आश्वासन देऊनही लोकपालमध्ये त्याचं पालन केलं नाही त्यामुळे आमच्या मनात राहुल गांधी यांच्याबद्दल संशय आहे असं स्पष्टीकरण आज अण्णा हजारे यांनी दिलंय. त्याचबरोबर कनिष्ठ नोकरशहा लोकपालमध्ये आलेच पाहिजेत अशी आग्रही भूमिकाही अण्णांनी पुन्हा एकदा मांडली. अण्णा आज राळेगणमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काल शुक्रवारी अण्णांनी लोकपालच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने घोर फसवणूक केलीय, असा आरोप पुन्हा एकदा केला. स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत काँग्रेसने घूमजाव करत क गटातल्या कर्मचार्‍यांना लोकपाल कक्षेत आणायला जोरदार विरोध केला. स्थायी समिती राहुल गांधींच्या इशार्‍यानुसार काम करते, असा आरोपही अण्णांनी केला होता. आज आपल्याच विधानाचा खुलासा देत अण्णांनी राहुल यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता असं मत व्यक्त केलं पण राहुल गांधी यांच्याबद्दल संशय आहे असंही स्पष्ट केलं.

close