मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

December 4, 2011 4:48 PM0 commentsViews: 2

04 डिसेंबर

अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे इथे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेत एका शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला. अरूण सभाने असं या शेतकर्‍याचं नाव आहे. नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांची सभा होती. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच अरूण सभाने उभे राहुन कापसाला भाव वाढून द्या अशी मागणी करू लागले. पण त्यांच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही, त्यानंंतर सभाने यांनी स्वत:जवळ किटकनाशकाची बाटली उघडून विष घेतलं. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. अरुण सभाने हा गोंडपिपरी इथला रहिवासी असून त्यांच्याकडे दोन एकर जमीन आहे आणि त्यांच्यावर दीड लाखाचे कर्ज डोक्यावर आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या सभाने यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कापूस उत्पादक शेतकर्‍यांना नक्कीच मदत करू, पण शेतकर्‍यांनी अशी टोकाची भूमिका घेऊ नये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

close