सहा महिन्यानंतर कनिमोळी परतल्या स्वगृही

December 3, 2011 2:34 PM0 commentsViews: 3

03 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी 190 दिवस तिहार जेलमध्ये घालवल्यानंतर अखेर द्रमुकच्या खासदार कनिमोळी आज त्यांच्या घरी चेन्नईला परतल्या. चेन्नईत द्रमुक कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. गेल्या मंगळवारी कनिमोळींना जामीन मिळाला होता. त्यानंतर त्या त्यांच्या दिल्लीतल्या घरी होत्या. जेलमधून बाहेर पडल्यानंतर कनिमोळी पहिल्यांदाच घरी गेल्यायत. कनिमोळी यांना लहान मुलगा असल्याने त्यांना जामीन मंजूर झाला. प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीसाठी त्या 6 डिसेंबरला परत दिल्लीला जातील.

close