अखेर पेडर रोडवरील फ्लायओव्हर रद्द

December 4, 2011 11:00 AM0 commentsViews: 2

04 डिसेंबर

पेडर रोड फ्लायओव्हर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. लता मंगेशकर आणि स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे हा फ्लायओव्हर रद्द करण्यात आला आहे. आता पेडर रोड ऐवजी हाजी अली जंक्शन आणि महालक्ष्मी मंदिरानजीकच्या कॅडबरी जंक्शनवर दोन फ्लायओव्हर बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी निवीदाही मागवण्यात आल्या आहेत. साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी सुरु केलेल्या विरोधाचं नंतर पेडररोड रहिवासी समितीत रुपातंर झालं. याप्रकरणी MSRDCच्या वतीने अनेक वेळा जनसुनावणी झाली. मंत्रिमंडळ समितीत हा निर्णय झाला असला तरी अद्याप नोटिफिकेशन मात्र निघालेलं नाही.

close