पेण अर्बन बँक विर्सजित होऊ देणार नाही – मुख्यमंत्री

December 3, 2011 3:19 PM0 commentsViews: 10

03 डिसेंबर

पेण अर्बन बँक विर्सजित होऊ देणार नाही, त्यासाठी मी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे साकडं घातलं आहे असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच या बँकेच्या पुन्नरुजीवनासाठी मी कट्टीबद्ध आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. ते पेणमध्ये प्रचार सभेत बोलत होते. त्याचबरोबर पेण अर्बन बँकेच्या सर्व ठेवीदारांची जबाबदारी मी स्वीकारत आहे असंही त्यांनी म्हटलंय. या प्रचारसभेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचीही भेटही घेतली. रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकींचा प्रचारासाठी मुख्यमंत्री रायगडमध्ये आले होते.

close